जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२३ । इटलीच्या कॅलाब्रिया किनाऱ्यावर एक बोट उलटून एका नवजात बालकासह ६१ निर्वासितांचा मृत्यू झाला आहे. हे निर्वासित पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराकमधील असल्याचे सांगितले जात आहे. इटलीच्या एनएसए वृत्तसंस्थेनुसार, स्टेकाटो डी कट्रो किनाऱ्यावर २८ मृतदेह मिळाले. इतर मृतदेह समुद्रातून बाहेर काढण्यात आले.
बोटीतील ५० जणांना वाचवण्यात यश आले आहे असून पाक, अफगाणिस्तान आणि इराकमधून निर्वासित इटली येथे येत होते. तेव्हा खराब हवामानामुळे बोट एका खडकावर आदळली आणि त्याचे दोन तुकडे झाले.
समुद्रमार्गे युरोपमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांसाठी इटली हा मुख्य उतरण्याचा मार्ग आहे. दरवर्षी दहा लाखांहून अधिक निर्वासित बोटीने इटलीत येतात. या मार्गाला भूमध्य मार्ग म्हणतात. हा जगातील सर्वात धोकादायक मार्ग आहे. काही संस्थांच्या मते, २०१४ पासून या मार्गावर २०,००० हून अधिक लोक मरण पावले आहेत किंवा बेपत्ता झाले आहेत.