---Advertisement---
राष्ट्रीय

भयंकर ! ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन 15 जणांचा दुर्दैवी मृत्यू

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जुलै २०२३ । उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात एका धक्कादायक घटना समोर आलीय. ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन यात तब्बल १५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून मृतांमध्ये चार पोलिसांचा समावेश आहे.तर या दुर्घटनेत इतर ७ जण जखमी झाले असून जखमींना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चमोली जिल्ह्याल्या अलकनंदा नदीच्या काठावर ही घटना घडली आहे.

chamoli news jpg webp webp

नेमकी घटना काय?
चमोली जिल्ह्याल्या अलकनंदा नदीच्या काठावर अचानक ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला असून ७ जण जखमी झाले आहेत. पावसामुळेच ही घटना घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये एक पोलीस उपनिरीक्षक आणि ३ होमगार्डचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

---Advertisement---

वीज प्रकल्पात बांधण्यात आलेल्या पुलाला विजेचा धक्का लागल्याने हा अपघात झाला. आधी जल निगमच्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. त्यानंतर इतरांना विजेचा धक्का बसला आणि त्यांचा देखील मृत्यू झाला. उत्तराखंडचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व्ही मुरुगेसन यांनी सांगितले की, ‘पोलिस उपनिरीक्षक आणि पाच होमगार्डसह जवळपास 15 जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणाचा तपास सुरू आहे. प्रथमदर्शनी असे दिसून आले आहे की, रेलिंगवर करंट होता. तपासात पुढील तपशील समोर येतील.’

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---