---Advertisement---
गुन्हे धरणगाव

दुर्दैवी : आईच्या तेराव्यानंतर शिक्षक मुलाचा अपघाती मृत्यू

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२२ । अमळनेर रोडवरील भोणे गावाजवळ गुरुवारी दुपारी एक दुर्दैवी घटना घडली आहे. चारचाकीने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार शिक्षकाला जीव गमवावा लागला असून सुरेश भिकाजी सोनवणे (वय.४९ रा.पारधीवाडा, धरणगाव) असे मयताचे नाव आहे. दरम्यान, १३ दिवसांपूर्वीच त्यांच्या आईचे निधन झाले होते.

deshdoot 2022 03 db21673a 1931 455b 9946 8b03189fff7e 3d04ce36 8d8e 43cb 902a 531375bc19c2

मुंबईच्या कुर्ला येथील गांधी बालविद्या मंदिर कोहिनूर सिटी येथे सुरेश सोनवणे हे कला शिक्षक होते. १३ दिवसांपूर्वी त्यांच्या आईचे निधन झाल्याने ते तेव्हापासून धरणगावात आलेले होते. गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास सुरेश सोनवणे हे कामानिमित्त आपल्या दुचाकीने भोणे गावाच्या दिशेने जात होते. याचवेळी भोणे गावाजवळील पांडुरंग सातपुते यांच्या शेताजवळ अचानक समोरून येणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात सुरेश सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला.

---Advertisement---

सुरेश सोनवणे यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी, वडील, भाऊ असा परिवार आहे. या संदर्भात पोलीस स्थानकात अपघाताची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पो.नि. राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ उमेश पाटील हे करीत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---