जळगाव जिल्हाराजकारण

ॲड देवकांत पाटील व हितेश गजरे यांच्या नेतृत्वात राज्य सरकारच्या निषेधार्थ नायब तहसीलदारांना निवेदन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑक्टोबर २०२२ । यावल येथील खरेदी-विक्री संघाच्या सभागृहात यावल राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षा च्या वतींने देशाची राष्ट्रीय एकता टिकवण्यासाठी भरीव योगदान देणारे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले त्याचबरोबर असामान्य कर्तुत्वाने जागतिक राजकारणात ठसा उमटणाऱ्या माजी पंतप्रधान स्व इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले

यावल राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरात येथे नेल्या संदर्भात निषेध व्यक्त करत यावल नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरात येथे नेण्यासंदर्भात संपूर्ण राज्यभर आज निषेध करण्यासाठी राज्य व जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नव्याने स्थापन झालेले सरकारच्या विरोधात आज निषेध करत निवेदन देण्यात आले

काही दिवसापूर्वी वेदांत प्रकल्प गुजरात येथे पाठवला काही दिवसापूर्वी टाटा एअर बस सेकंड असे प्रकल्प गुजरात येथे पाठवण्यात आले मागील २०१४ ते १९ मध्ये ही फडणवीस सरकारने आय एफ एस सी एन एस जी यासारखे प्रकल्प गुजरात येथे नेण्यात तत्कालीन सरकार ने सहकार्य केले केंद्रीय नेतृत्वाची हुजेरेगिरी करण्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेचा रोजगार हिसकावून गुजरातच्या घशात घालण्याचा केविलवाणा प्रकार हे सरकार करत असून आम्ही या घटनेचा निषेध व्यक्त करतो तसेच गेलेले प्रकल्प महाराष्ट्रात पुन्हा परत आणावेत आणि पुन्हा असे कृत होता कामा नये अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल त्यामुळे कायदा व सुव्यवस्था चा प्रश्न निर्माण झाल्यास विद्यमान सरकार जबाबदार राहील अशा आशयाचे निवेदन नायब तहसीलदार यावल यांना देण्यात आले

याप्रसंगी निवेदन देताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड करा देवकांत पाटील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष हितेश गजरे राष्ट्रवादी चे समन्वयक किशोर माळी तालुका सरचिटणीस हेमंत दांडेकर जिल्हा युवक सरचिटणीस विनोद पाटील तालुका कार्याध्यक्ष नरेंद्र शिंदे तालुका सचिव विनोद पाटील सदस्य गोपाळ पाटील संघटक भूषण नेमाडे, विजय भोई ,पवन पाटील, यश अडकमोल , लक्ष्मण धनगर आदींची निवेदन देते प्रसंगी उपस्थिती होती .

Related Articles

Back to top button