⁠ 
रविवार, जानेवारी 5, 2025
Home | गुन्हे | Jalgaon : तलवारीसह पिस्टल बाळगणार्‍या मामा-भाच्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या..

Jalgaon : तलवारीसह पिस्टल बाळगणार्‍या मामा-भाच्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जानेवारी २०२४ । नवीन वर्षाच्या पहिल्या रात्री जळगाव शहरात शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने एक महत्वाची कारवाई करत मामा-भाच्यांना गावठी पिस्तुल आणि धारदार तलवारसह अटक केली. ही कारवाई शनिपेठ परिसरात करण्यात आली

शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे गुन्हे शोध पथक शहरातील पेट्रोलिंग करीत होते. या पेट्रोलिंग दरम्यान, १ जानेवारी रोजी मध्यरात्री अडीच वाजता रेकॉर्डवरील संशयित शाम साहेबराव सपकाळे (वय ३०, रा. असोदा रोड) गावठी पिस्तुल घेऊन दहशत माजवताना दिसून आला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले आणि त्याच्याकडून गावठी पिस्तुल आणि दोन जीवंत काडतूस जप्त केले.

शाम साहेबराव सपकाळे याच्यावर अधिक तपास सुरू असताना, त्याचा भाचा विशाल उर्फ सोनू धनराज सोनवणे (वय २०, रा. असोदा रोड) हाही संशयित ठरला. त्याच्या कडेही एक धारदार तलवार जप्त करण्यात आली. या दोघांविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक योगेश ढिकले हे तपास करत आहेत.

नवीन वर्षाच्या पहिल्या रात्री कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्याला पेट्रोलिंगसह नाकाबंदी करण्याच्या सूचनाही पोलिस अधीक्षकांनी दिल्या होत्या, ज्याचा फायदा या कारवाईत झाला.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.