जळगाव जिल्हाजळगाव शहर

अतूट प्रेम ! पत्नीच्या १३व्याला सोडला पतीने जीव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२३ । पती आणि पत्नी यांच्यातील प्रेम किती असत याचा प्रत्यय जळगावात मेहरुन परिसरात आला. कारण पत्नीच्या पत्नीच्या तेराव्याचा कार्यक्रम संपल्यानंतर काही मिनिटांतच पतीचाही मृत्यू झाला. यामुळे संपूर्ण मेहेरून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अधिक माहिती अशी कि, शकुंतलाबाई श्रीराम बोडखे (वय ७५ वर्ष) यांचं दोन आठवड्यांपूर्वी निधन झालं होतं. त्यांच्या तेराव्याच्या दिवशी ७८ वर्षीय पती श्रीराम भिमराव बोडखे यांनीही अखेरचा श्वास घेतला. जळगाव मेहरूण परिसरातील भवानी नगर येथील वाय. डी. पाटील शाळेसमोर राहणाऱ्या शकुंतलाबाई श्रीराम बोडखे यांचे 8 जानेवारी रोजी निधन झाले. रात्री अकरा वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

पुढे त्यांच्या गंधमुक्ती व तेरावीचा कार्यक्रम शुक्रवार २० जानेवारी रोजी पार पडला.यावेळी शकुंतलाबाई यांचे पती श्रीराम भिमराव बोडखे (वय ७८ वर्ष) यांनी देखील जीव सोडला. पत्नी शंकुतलाबाई यांचा विरह त्यांचा सहन झाला नाही, यातून शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास श्रीराम बोडखे यांची प्राणज्योत मालवली.श्रीराम बोडखे यांच्या पश्चात ताराचंद बारी, अनिल बारी असे दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ताराचंद बारी हा रिक्षा चालक आहे तर अनिल बारी हे कंपनीत नोकरीला आहेत.

Related Articles

Back to top button