जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२४ । बदलापुरातील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद बदलापुरात उमटताना दिसून आले. या घटनेनंतर बदलापूर रेल्वे स्थानकावर आज सकाळपासून हजारोंच्या संख्येने आंदोलक जमा झाले आहेत. चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्यांना फाशी द्या, अशी मागणी करत आंदोलकांनी रेल्वे स्थानकावर उद्रेक केलाय. आंदोलकांचा आक्रोश पाहता राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी गिरीश महाजन यांनी याप्रकरणी एक मोठं वक्तव्य केलं.
या प्रकरणाचा ऍड उज्ज्वल निकम यांना आम्ही हा खटला चालवायला देणार आहोत”, अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली. बदलापुरात झालेल्या घटनेबद्दल जेवढा तुमच्या मनात राग आहे. तेवढा आमच्या मनातही आहे. चर्चेतून विषय सुटत असतो. इथे कुणाची लीडरशीप नाहीये. कुणी कुणाचं ऐकत नाही. तरुण आहेत. त्यांचा राग योग्य आहे. पण रेल्वे बंद करणं हा पर्याय नाही. एसआयटी नेमली आहे. फार्स्ट ट्रॅकमध्ये खटला चालवणार आहेत. उज्ज्वल निकम यांना आम्ही हा खटला चालवायला देणार आहोत”, अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली.
“पीआयला निलंबित केलं. मुख्याध्यापकाला निलंबित केलं. कुणाची लीडरशीप नाहीये. एका गावचेही नाही. स्थानिकही नाही. त्यामुळे कुणाशी बोलावं. कुणाला कोण समजावणार हे कठिण झालं आहे. लोक आरोपीला फाशी द्या असं म्हणत आहेत. पण आपल्याकडे तसा कायदा नाही. जे शक्यच नाही अशी मागणी मान्य करता येत नाही. घटना संतापजनक आहे. आमच्या मनातही तेवढाच राग आहे. पण ही शिक्षा कायद्याने द्यावी लागेल. कसाबने एवढी माणसे मारली. पण त्यालाही आपण कायद्यानेच शिक्षा दिली”, असेही गिरीश महाजन म्हणाले.