⁠ 
मंगळवार, मे 7, 2024

पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी! 300 जागांसाठी भरती, पगार 62,265

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही महत्वाची बातमी आहे. युनायटेड इंडिया इन्शुरन्स लिमिटेडने देशभरात सहाय्यक पदासाठी भरती जाहीर केली आहे. पदवी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी ठरू शकते. या भरतीद्वारे एकूण ३०० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच कंपनीने याबाबत अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे.

या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्ज प्रक्रिया उद्या म्हणजेच १६ डिसेंबर २०२३ पासून सुरु होणार आहे. तर ०६ जानेवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

पदाचे नाव : सहाय्यक – ३०० जागा
शैक्षणिक पात्रता : उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा. तसेच त्याला लेखन, वाचन आणि उत्तम संवाद कौशल्याची जाण असावी.
वयोमर्यादा : किमान वय २१ वर्षे ते कमाल वय ३० वर्षे. यामध्ये राखीव प्रवर्गाला सवलत देण्यात आली आहे.

अर्ज शुल्क : या भरतीकरिता १००० रुपये अर्ज शुल्क आहे तर एससी/ एसटी आणि राखीव प्रवर्गाला २५० रुपये अर्जशुल्क आहे.
पगार : 22,405/- रुपये ते 62,265/- रुपये.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 जानेवारी 2024

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा