भुसावळमार्गे धावणार उधना-हसनपूर विशेष अनारक्षित गाडी; कोण-कोणत्या स्थानकांवर थांबेल?

फेब्रुवारी 18, 2026 3:16 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । आगामी होळी सण आणि उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून अनेक विशेष गाड्या चालविल्या जात आहे. यातच आता रेल्वेनं उधना ते हसनपूर रोड दरम्यान विशेष अनारक्षित साप्ताहिक रेल्वेगाडी चालविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. विशेष या गाडीला भुसावळला थांबा देण्यात आल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला.

train

गाडी क्रमांक ०९०३१ उधना–हसनपूर रोड अनारक्षित साप्ताहिक विशेष गाडी दर रविवारी सकाळी ११:२५ वाजता उधना येथून सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी ०८:०० वाजता ही गाडी हसनपूर रोड येथे पोहोचेल. ही सेवा १५ फेब्रुवारीपासून २९ मार्चपर्यंत उपलब्ध राहणार आहे. त्याचप्रमाणे, ०९०३२ हसनपूर रोड–उधना विशेष गाडी दर सोमवारी रात्री ०९:४५ वाजता हसनपूर रोड येथून सुटेल आणि बुधवारी दुपारी ०३:०० वाजता उधना येथे पोहोचेल. ही गाडी १६ फेब्रुवारी ते ३० मार्चदरम्यान धावणार आहे.

Advertisements

या स्थानकांवर असेल थांबा?
उधना–हसनपूर रोड दरम्यान धावणारी विशेष गाडी दोन्ही बाजुने चलथान, बारडोली, नंदुरबार, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र जंक्शन, हाजीपूर, मुझफ्फरपूर आणि समस्तीपूर या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबेल.

Advertisements

दोन्ही विशेष गाड्यांना संपूर्णपणे सामान्य द्वितीय श्रेणीचे (अनारक्षित) डबे जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे कोणत्याही आरक्षणाशिवाय प्रवाशांना प्रवास करता येणार असून गाडीच्या वेळापत्रकाबाबत व थांब्यांबाबत अधिकृत माहिती रेल्वेच्या संकेतस्थळावर तसेच स्थानकांवरील सूचना फलकांवर उपलब्ध करून देण्यात येईल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now