⁠ 
सोमवार, जुलै 22, 2024

खुशखबर! उधना-बरौनी स्पेशल एक्स्प्रेस धावणार, भुसावळसह जळगाव स्थानकांवर असेल थांबा..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ फेब्रुवारी २०२४ । भुसावळ मार्गे सुरतकडे जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि त्यांच्या प्रवासाची मागणी पूर्ण करण्यासाठी पश्चिम रेल्वेने उधना-बरौनी दरम्यान, साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीला भुसावळ, जळगाव स्थानकांवर थांबा असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांची सोय झाली.

पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीनुसार, ट्रेन क्रमांक ०९०३७ उधना-बरौनी जं. ही विशेष गाडी उधना येथून दर शुक्रवारी सकाळी 08.35 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 14.00 वाजता बरौनी जंक्शनला पोहोचेल. ही ट्रेन 23 फेब्रुवारी ते 29 मार्च 2024 पर्यंत धावणार आहे.

त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक 09038 बरौनी-उधना स्पेशल ट्रेन दर शनिवारी सायंकाळी 17.00 वाजता बरौनी जंक्शन येथून सुटेल. ती दुसऱ्या दिवशी उधना येथे रात्री 22.00 वाजता पोहोचेल. ही ट्रेन 24 फेब्रुवारी ते 30 मार्च 2024 पर्यंत धावणार आहे.

या स्थानकांवर असेल थांबा
ही गाडी नंदुरबार, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी जंक्शन, जबलपूर, कटनी जंक्शन, सतना, माणिकपूर जंक्शन, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा आणि पाटणा जं. स्थानकांवर दोन्ही दिशेने थांबेल.

या ट्रेनला स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड क्लासचे डबे असतील. ट्रेन क्रमांक 09037 साठी बुकिंग आज म्हणजेच 21 फेब्रुवारी 2024 पासून सर्व PRS काउंटरवर आणि IRCTC वेबसाइटवर सुरू होईल. ट्रेनचे थांबे, रचना आणि वेळ यासंबंधी तपशीलवार माहिती www.enquiry.indianrail.gov.in वर मिळू शकते.