---Advertisement---
महाराष्ट्र राजकारण

उद्धव ठाकरेंची फडणवीसांना खुली ऑफर : तुम्ही शिंदेंना सोडा, मी सगळी शिवसेना घेऊन भाजपसोबत येतो

---Advertisement---

thakre shinde fadanvis jpg webp

जळगाव लाईव्ह न्युज । १४ जुलै २०२२ । फडणवीस “तुम्ही एकनाथ शिंदेना सोडा, मी सगळी शिवसेना घेऊन तुमच्यासोबत येतो.” अशी खुली ऑफर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिली होती. ही ऑफर ठाकरे यांनी फडणवीसांना शपथविधीआधी दिली होती. अशी चर्चा संपूर्ण राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

---Advertisement---

याबाबतचे वृत्त एका खासगी वृत्तवाहिनीने प्रकाशित केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन करून हि ऑफर दिली होती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याआधी उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना फोन करून ही ऑफर दिली होती. असे वृत्त प्रकाशीत करण्यात आले आहे. यावेळी उद्धव ठाकरे फडणवीसांना म्हणाले होते कि, फडणवीसजी तुम्ही मुख्यमंत्री व्हा, एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेवा, मी सगळी शिवसेना घेऊन तुमच्याकडे येतो. असे खुली ऑफर दिल्याचे वृत्त एका खासगी वृत्त वाहिनीने प्रकाशीत केले आहे.

राष्ट्रपती निवडणुकीच्या पूर्वसंध्येला हि बातमी प्रकाशित झाली असल्याने याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. शिंदेंना दूर करत त्यांचे राजकीय आयुष्य संपवण्याचा हा डाव होता. अश्या प्रतिक्रिया सर्वसामान्य जनता देत असताना यावर शिवसेनेकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

मात्र आलेल्या वृत्तानुसार फडणवीस यांना ठाकरे म्हणले होते कि, “मी बाळासाहेबांचा पुत्र सगळी शिवसेना तुमच्यासोबत घेऊन यायला तयार आहे, तुम्ही शिंदे यांना बाजूला ठेवा.” मात्र यावर फडणवीस म्हणाले “आता ही वेळ निघून गेलेली आहे, उशीर झालेला आहे.”

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---