⁠ 
रविवार, मे 5, 2024

जुलै महिन्यात ‘या’ कारणासाठी उद्धव ठाकरे येणार जळगाव शहरात

जळगाव लाईव्ह न्यूज | 21 जून 2023 | पिंप्राळा उपनगरातील मुख्य चौकात शिवस्मारक साकारले जात आहे. या शिवस्मारकाचे काम युद्धपातळीवर सुरु असून जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काम पूर्ण करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्याचे नियोजन आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण केले जाणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पूर्णाकृती पुतळा तयार करण्यासाठी ४ टन ब्रॉन्झ (कासे) धातूचा वापर करण्यात आलेला आहे. त्यामुळे पिढ्यांपिढ्या पुतळ्याची चमक कायम राहणार आहे. यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात दोन कोटी रुपये खर्चाची तरतुद करण्यात आली आहे. पुतळा तयार झालेला असून जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुतळा शिवस्मारकावर विराजमान होणार आहे. तसेच जुलै महिन्यातच पुतळ्याचे लोकार्पण केले जाणार आहे.

तांबे, पितळ, लोखंड, शिसे, ॲल्युमिनयम आदी धातू मिळून ब्रॉन्झ धातू तयार होतो. हा धातू कधीही नष्ट न होणारा आहे. या धातुमुळे ऊन, वारा व पाऊस याचा कोणताही परिणाम या पुतळ्यावर होणार नाही. ब्रॉन्जला कासाही म्हणतात. प्राचीन काळापासून या धातूला अनन्य साधारण महत्व आहे.

  • शिवस्मारकावर होणारा खर्च
    पुतळा : ९० लाख

चबुतरा : ५८ लाख
कारंजे सुशोभिकरण : २० लाख

विद्युत रोषणाई : १० लाख
इतर खर्च : २२ लाख

एकूण खर्च : २ कोटी रुपये

पुतळा उंची : १५ फूट
चबुतरा उंची : ३ मीटर

ब्रान्झ धातू : ४ टन

पिंप्राळा येथील शिवस्मारकाचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काम पुर्ण होऊन पुतळा बसविण्यात येणार आहे. तसेच या पुतळ्याच्या लोकार्पणासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे स्व: येणार असल्यामुळे लोकार्पण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत आहे.

  • कुलभूषण पाटील, उपमहापौर, महानगरपालिका