⁠ 
शनिवार, मे 4, 2024

मग शिवसेनेची काँग्रेस कशी होणार? भाजप-शिंदे गटाच्या टीकेचा उद्धव ठाकरेंनी घेतला समाचार

जळगाव लाईव्ह न्यूज । १० सप्टेंबर २०२३ । शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे जळगावात असून त्यांची जाहीर सभा होत आहे. दरम्यान, बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) शिवसेनेची मी काँग्रेस होऊ देणार नाही, असं सांगायचे, असं शिंदे गट आणि भाजपकडून सांगितलं जात आहे. आता या टीकेचा उद्धव ठाकरे यांनी आज समाचार घेतला आहे.

आम्ही भाजपशी 25 वर्ष युती केली. या काळात आम्ही शिवसेनेची भाजप होऊ दिली नाही, मग काँग्रेससोबत गेल्याने शिवसेनेची काँग्रेस कशी होणार? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला

इंडिया आघाडीची बैठक झाली. माझा पक्ष चोरला. नाव चोरलं. तरीही उद्धव ठाकरेंना इंडिया आघाडीत किंमत होती. ते तुमच्यामुळेच झालं. या बैठकीच्यावेळी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, अशी पोस्टर लावली गेली. खरंय. बाळासाहेब तसे म्हणाले होते. पण जशी भाजपसोबत 25 वर्ष राहून शिवसेनेची भाजप झाली नाही. मग शिवसेनेची काँग्रेस कशी होणार? तुम्ही मेहबूबा मुफ्ती सोबत बसला. मुफ्तीसोबत जाऊन भाजपचा पीडीपी झाला होता का?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

मी कमळाबाईची पालखी वाहणार नाही. त्यासाठी शिवसेना स्थापन झाली नाही. भाजपला कमळाबाई बोलतो. कारण शिवसेना तीच आहे याचा पुरावा देण्यासाठीच कमळाबाई म्हणतो. यापुढेही म्हणेल, असंही ते म्हणाले.