खान्देशात पुन्हा भगवा फडकवण्यासाठी उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये

जळगाव लाईव्ह न्यूज : १९ मे २०२३ : शिवसेनेत झालेल्या बंडा नंतर खान्देशामध्ये शिवसेनेला मोठा फटका बसला आहे. यामुळे आता खुद्द उद्धव ठाकरे यांनी खान्देशात पक्ष वाढवण्यासाठी पुढे येण्याचा निर्धार केला आहे. नुकतीच याबाबत जिल्हाप्रमुखांची बैठक सुद्धा झाली.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हाप्रमुखांची बैठक झाली. या बैठकीमध्ये जिल्हाप्रमुखांना सुप्रीम कोर्टाचा निर्णय नक्की काय आहे. याबाबतची माहिती देण्यात आली. देवेंद्र फडणवीस हे माध्यमांशी बोलताना चुकीची माहिती देत असल्याचे यावेळी उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना सांगितले असल्याचे समजत आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबाबत नागरिकांमध्ये चुकीची माहिती नागरिकांना पुरवली जात आहे. किंबहुना ती पसरवली जातात अशावेळी शिवसेनेचा जिल्हाप्रमुखांना सुप्रीम कोर्टाचा निर्णय नक्की काय लागला याची संपूर्ण माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

याचबरोबर येत्या काळात शिवसेना पक्ष वाढीसाठी कष्ट घेऊन तो वाढवण्याचे आदेशही यावे जिल्हा प्रमुखांना देण्यात आले. खास करून खान्देशामध्ये पक्ष कसा वाढेल याकडेही लक्ष द्या असे जिल्हाप्रमुखांना सांगण्यात आले.