उद्धव ठाकरेंना स्वपक्षीय खासदारांचा दणका : बैठकीला अनुपस्थिती
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२२ । शिवसेनेच्या चाळीस आमदारांपाठोपाठ आता शिवसेनेचे खासदारही शिंदे गटात जातात की काय ? असा प्रश्न उद्भवू लागला आहे. कारण उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व खासदारांची तातडीची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला दहा खासदारांनी दांडी मारली. यामुळे आता लोकसभेतही शिवसेना खिळखिळी होते की काय? असा प्रश्न विचारला जात आहे.
शिवसेनेच्या बैठकीला खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत, राहुल शेवाळे, गजानन कीर्तिकर, धर्यशील माने, हेमंत गोडसे, श्रीरंग बारणे, प्रतापराव जाधव, सदाशिव लोखंडे, ओमराजे निंबाळकर उपस्थित होते. तर दुसरीकडे खासदार भावना गवळी, श्रीकांत शिंदे, राजन विचारे, संजय जाधव, राजेंद्र गावित, कृपाल तुमाने, संजय मंडलिक,कलाबेन डेलकर, हेमंत पाटील हे अनुपस्थित होते.
राज्यसभा खासदार संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी देखील बैठकीला उपस्थित होत्या. शिवसेनेतील चाळीस आमदार फोडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार बसल आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. शिवसेनेचे खासदार शिंदे गटात असल्याचे दावा गुलाबराव पाटील यांनी केला होता. त्यानंतर भाजपासोबत जायला हवं असे मत खासदार भावना गवळी यांनी व्यक्त केलं होतं. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपचा उमेदवाराला आपण मतदान करावं अशी मागणी शिवसेनेच्या काही खासदारांनी केली होती. मात्र आता पुढे काय होतं ? .हे पाहणं उत्सुक ठरणार आहे.
उद्धव ठाकरे सध्या एकाकी पडले असलेले चित्र संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. आधी आमदार, नंतर नगरसेवक आणि आता खासदारही निघून जातात की काय? असा प्रश्न जनतेसमोर उपस्थित झाला आहे