⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

हिम्मत असेल तर स्वस्त:च्या बापाच्या नावाने मत मांगा ; बंडखोर आमदारांवर उद्धव ठाकरे गरजले

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जून २०२२ । एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेच्या जवळपास ४० आमदारांनी केलेल्या बंडानंतर राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. गेल्या ५ दिवसापासून सुरू असलेला हा राजकीय अस्थिरतेचा गोंधळ अजूनही संपलेला नाही. दरम्यान, आज शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव बंडखोरांना वापरता येणार नाही. हिम्मत असेल तर स्वस्त:च्या बापाच्या नावाने मत मांगा, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना सुनावलं आहे.

ज्यावेळी माझी निवड करण्यात आली त्यावेळी बाळासाहेबांनी सगळ्या पदाधिकाऱ्यांना विचारलं होतं. ही आठवण त्यांनी आज कार्यकारिणीच्या बैठकीत सांगितलं. शिवसेनेशी बेईमानी करणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार उद्धव ठाकरेंकडेच असणार हे आता स्पष्ट झालं आहे. “मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाशी प्रतारणा आजतादायत केली नाही. इथून पुढेही करणार नाही. हिंमत असेल तर स्वताच्या बापाच्या नावाने मते मागा. आधी नाथ होते, आता दास झाले”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.