जळगाव लाईव्ह न्यूज । ७ नोव्हेंबर २०२४ । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षांकडून आपापले जाहीरनामे प्रसिध्द करण्यात येत असून शांतच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने त्यांचा वचननामा जाहीर केला आहे, ज्यामध्ये महिला, शेतकऱ्यांसह विविध वर्गांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत. या वचननाम्यात नोकरी, शिक्षण, आरोग्य आणि महिला सशक्तीकरण यासारख्या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला आहे.
ठाकरे गटाने आपल्या वचननाम्याद्वारे मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांमध्ये चुरशीची लढाई असण्याची शक्यता आहे.
महत्त्वपूर्ण घोषणा
संस्कार
प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य, देखणे आणि प्रेरणादायी मंदिर उभारणार.
अन्नसुरक्षा
शेतकऱ्यांचे नुकसान होवू न देता गहू, तांदूळ, डाळ, तेल आणि साखर ५ जीवनावश्यक वस्तूंचे भाव ५ वर्षे स्थिर ठेवणार.
महिला
महिलांना मिळणारे सरकारी अर्थसहाय्य वाढवणार.
प्रत्येक पोलीस स्टेशन बरोबरीने स्वतंत्र २४x७ महिला पोलीस ठाणे सुरु करणार.
अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांच्या वेतनात वाढ करणार.
आरोग्य
प्रत्येक कुटुंबाला २५ लाखांपर्यंतची कॅशलेस मेडिकल ट्रीटमेंट उपलब्ध करून देणार.
शिक्षण
जात-पात-धर्म-पंथ न पहाता, महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला मुलींप्रमाणे मोफत शिक्षण देणार.
पेन्शन
सरकारी कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार.
शेतकरी
‘विकेल ते पिकेल’ धोरणानुसार बळीराजाच्या पीकाला हमखास भाव मिळवून देणार.
वंचित समूह
वंचित समूहांच्या हक्कांच्या रक्षणासाठी महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करणार.
मुंबई
धारावीकरांना त्यांच्या उद्योगांच्या सोयींसह राहतं घर तिथल्या तिथे देणार.
मुंबईतील आणि महाराष्ट्रातील भूमीपुत्रांच्या रोजगारासाठी जागतिक दर्जाचे आर्थिक व औद्योगिक केंद्र उभारणार.
उद्योग
बारसू येथील रिफायनरी प्रकल्प रद्द करणार. निसर्ग उध्वस्त करणाऱ्या विनाशकारी प्रकल्पांना परवानगी न देता पर्यावरणस्नेही उद्योगांना प्रोत्साहन देणार.