⁠ 
सोमवार, जानेवारी 6, 2025
Home | जळगाव जिल्हा | मुक्ताईनगर | उचंदा गावातील महिलांनी अडवला पालकमंत्र्यांचा ताफा

उचंदा गावातील महिलांनी अडवला पालकमंत्र्यांचा ताफा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२१ । कोरोना काळात गावात पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा या गावात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा ताफा अडवला. या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला होता.

रावेर व मुक्ताईनगर तालुक्यात दोन दिवसांपूर्वी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली होती. यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे शनिवारी दोन्ही तालुक्यांचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान उचंदा गावातील महिलांनी पाणीटंचाईच्या मुद्द्यावरून त्यांचा ताफा अडवला.

संतप्त महिलांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा ताफा अडवून पाणीटंचाईची समस्या मांडली. ऐन करोना काळात गावात पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. महिलांना पाण्याअभावी मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. आम्हाला पाणी उपलब्ध करून घ्या, तुम्ही पाण्याचे मंत्री आहेत. आमच्या गावात पंधरा दिवसांपासून पाणी नाही. गावातील सरपंच, ग्रामसेवक आमची समस्या ऐकून घेत नाहीत, अशा शब्दांत महिलांनी आपली व्यथा मांडली.निदान

तात्काळ कार्यवाहीच्या सूचना

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महिलांच्या अडचणी जाणून घेत त्यांना समस्येचे निराकारण करण्याचे आश्वासन दिले. ग्रामसेवक आणि बीडीओ यांना तातडीने पाणीटंचाई सोडविण्याचे निर्देश दिले. याबाबतचा सविस्तर अहवाल तयार करून तो आमदारांना सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.