⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

दिवाळीच्या दिवशी जामनेर तालुक्यात घडली अत्यंत दुर्दैवी घटना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑक्टोबर २०२२ । जामनेर तालुक्यात फत्तेपूर दिवाळीच्या दिवशी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडलीय. वीज तार जोडण्या साठी गेलेल्या दोन वायरमेनचा विजेच्या धक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय. गणेश नेमाडे आणि सुनील परदेशी अशी मयत दोघा वायरमनची नावे असून या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

नेमकी काय आहे घटना?
फत्तेपुर गावात एका शेत शिवारात वीज तार तुटल्याची घटना घडली होती. घटनेची माहिती मिळाल्यावर ही तुटलेली वीजेची तार जोडण्यासाठी वायरमन गणेश नेमाडे आणि सुनील परदेशी हे घटनास्थळी गेले होते. याच दरम्यान या दोघा वायरमनना शेतात पडून असलेली वीज तार लक्षात न आल्याने दोघाचाही त्या तारेला स्पर्श झाल्याने जोरदार विजेचा धक्का बसला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

दरम्यान, या दुर्घटनेनंतर मंत्री गिरीश महाजन यांनी मृताच्या नातेवाईकांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं. दिवाळीच्या दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे जिल्ह्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.