⁠ 
मंगळवार, डिसेंबर 3, 2024
Home | गुन्हे | महामार्गावर दुचाकीस्वार ट्रकवर धडकून गंभीर जखमी

महामार्गावर दुचाकीस्वार ट्रकवर धडकून गंभीर जखमी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज। ३१ जुलै २०२३। जळगाव शहरातील इच्छादेवी चौकातील अशोक वाईन समोर दुचाकी ट्रकला धडकल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ३० जुलै सायंकाळी ७ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील इच्छादेवी चौकाजवळ असलेल्या अशोक वाईन समोर असलेल्या महामार्गावरून ट्र्क जात असतांना दुचाकीने जात असलेल्या दुचाकीस्वार ट्रकवर धडकला. यात दुचाकीस्वार अनिल सुरेश चव्हाण हा जखमी झाल्याची घटना रविवार ३० जुलै रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली.

जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी ट्रक चालक सजाद अहमद (वय २३ रा. जम्मू काश्मीर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपस पोलीस नाईक जुबेर तडवी करीत आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.