---Advertisement---
शैक्षणिक जळगाव शहर

आंतरशालेय कॅरम स्पर्धेत रायसोनी पब्लिक स्कूलचे दोन विद्यार्थी चमकले

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२२ । सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमधील ऋत्विक अग्रवाल व महर्षी जोशी या विद्यार्थ्यांनी जैन स्पोर्टस एकॅडमी आयोजित तसेच जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. पुरस्कृत 12 वर्षाखालील आंतरशालेय जैन चँलेंज जिल्हास्तरीय कॅरेम स्पर्धेमध्ये ऋत्विक अग्रवाल याला उपविजेते पद तर महर्षी जोशी याने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त करत घवघवीत यश संपादन केले. तसेच याच स्पर्धेतील बॅडमिंटन या क्रीडाप्रकारात जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या २२ विध्यार्थ्यानी सहभाग नोंदविला. याबद्दल या विद्यार्थ्यांचा स्कूलच्या वतीने सन्मान करण्यात आला.

jalgaon 93 jpg webp

यावेळी जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व गौरवपत्र देऊन विजयी विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या दरम्यान उपस्थित विध्यार्थी खेळाडूंना मार्गदर्शन करतांना मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी नमूद केले कि, जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका सौ. राजुल रायसोनी तसेच क्रीडाशिक्षक संजय चव्हाण व सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी यासह सर्व पालक या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच या यशामागे या खेळाडूंनी घेतलेली मेहनत, त्यांच्यामध्ये असणारी कौशल्ये व क्रीडा शिक्षकांचे त्यांना लाभलेले उत्तम मार्गदर्शणामुळेच विद्यार्थ्यांना हे यश प्राप्त झाले असे त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

---Advertisement---

शालेय शिक्षणाबरोबरच क्रीडा शिक्षणालाही महत्त्वपूर्ण स्थान देणारी, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व शारीरिक गुणवत्तेस सतत प्रेरणा व चालना देणाऱ्या सी.बी.एस.ई.बोर्डच्या जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचे विध्यार्थ्यांच्या या यशामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---