जळगाव लाईव्ह न्यूज । पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दोन कर्मचाऱ्यांची उचलबांगडी केली. बंगाली कारागिराकडे असलेले सोने बेहिशेबी ठरवून त्याच्याकडून ७ लाख रुपये घेतल्याच्या प्रकरणामध्ये चौकशीत तथ्य आढळल्याने दोघांची बदली केली.

डीवायएसपी गावित यांनी चौकशी केली. त्यानंतर या दोघांची बदली करण्यात आली आहे. पोलिस शिपाई कमलेश पाटील यांची अमळनेर तालुक्यात मारवड येथे तर विक्की इंगळे यांची पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे बदली केल्याचे आदेश काढण्यात आले आहेत.

नेमकं प्रकरण काय?
७ जुलै रोजी सुभाष चौकात एका बंगाली कारागिराकडे असलेले ३० लाखाचे ३०० ग्रॅम सोन्याचे दागिने बेहिशोबी म्हणून शनिपेठ पोलिस कर्मचाऱ्याने पकडले. त्यानंतर हा कारागिर एका राजकीय पुढाऱ्याकडे गेल्यानंतर त्याने मध्यस्थी केल्यावर पोलिसांनी त्यातील ७० ग्रॅम सोने ठेवून घेतले व उर्वरित २३० ग्रॅम सोने परत केल्याच्या या प्रकाराची सराफा व पोलिस वर्तुळात जोरदार चर्चा आहे.या प्रकरणात पोलिस अधीक्षकांनी कारागिराला बोलावून घेत चौकशी केली असता, त्याने सोने पोलिसांनी सोने परत केल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर डीवायएसपी गावित यांनी चौकशी करून दोघांची बदली केली.







