Jalgaon : दुचाकी लांबविणारे दोघे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरटयांनी धुमाकूळ घातला असून याच दरम्यान जळगाव शहरातील मेहरूण परिसरात दुचाकी चोरीसाठी दाखल झालेल्या गुन्ह्यात एमआयडीसी पोलीस स्टेशनने महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे. भिलपुरा चौकी भागातून दोघा संशयित आरोपींना जेरबंद करण्यात आले.
साजिद हबीब खाटीक (वय-१९, रा. मेहरूण जळगाव) यांची दि. ११ जानेवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घरासमोर ४५ हजार रुपयांची हिरो होंडा कंपनीची मोटरसायकल (एम.एच १९ ए.आर ५३४७) अज्ञात इसमाने चोरून नेली होती. या गुन्ह्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून दिपक दयाराम (वय-३४) व दिपक एकनाथ शेलै (वय-३१, दोघे रा. रेणुकानगर, जळगाव) यांना अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींनी चोरी केलेली मोटरसायकल कबुली दिली. न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलीस कोठडी दरम्यान गुन्ह्यातील ४५,००० रुपयांची हिरो होंडा कंपनीची स्लेडर मोटरसायकल (एम एच १९ ए आर ५३४७) जप्त करण्यात आली.
या कार्यवाहीचे नेतृत्व पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेडडी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागिय पोलीस अधिकारी संदीप गावित, पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी केले. पो.उप.नि राहुल तायडे, पो.उप.नि चंद्रकांत धनके, पोहेकों गणेश शिरसाळे, पोना विकास मारोती सातदिवे, किशोर पाटील, योगेश बारी, पोकों गणेश ठाकरे, अफजल बागवान, शनिपेठ पोस्टेचे पोकॉ अनिल कांबळे व पोकों पराग दुसाने यांनीही या कार्यवाहीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.