---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

घरफोडी करणाऱ्या दोन संशयितांच्या आवळल्या मुसक्या; लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२४ । फैजपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील दोन घरफोडीमध्ये दागिण्यांसह रोख रक्कम चोरून नेणाऱ्या दोन संशयित चोरट्यांच्या फैजपूर पोलिसांनी शिरपूर येथून मुसक्या आवळल्या आहे. त्यांच्याकडून ३ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

faijpur gharphodi jpg webp

याबाबत फैजपुर पोलीस ठाण्यात २४ मे आणि १८ जून रोजी असे वेगवेगळे दोन घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ४ लाख ३२ हजारांचा ऐवज चोरून नेला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना सीसीटीव्ही आणि तांत्रिक मदतच्या आधारे शोध घेण्यास सुरुवात केली त्यावेळी शिरपूर पोलिसांनी काही आरोपींना घरपोडीच्या गुन्ह्यात अटक केलेली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारे संशयित आणि हे आरोपी एकच असल्याचे निष्पन्न झाले.

---Advertisement---

त्यानंतर पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी अन्नपूर्णा सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूर पोलीस ठाण्याच्या पथकाने शिरपूर येथे जाऊन राजेद्रसिंग उर्फ राजन प्रितमसिंग बरनाला वय-२६, ईश्वरसिंग नुरबिनसिंग चावला वय-२३ दोघे रा.उमर्टी ता.वरला जि. बडवाणी राज्य मध्यप्रदेश दोघी संशयित आरोपींना अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी घरबोडी केल्याचे कबुली दिली आहे. त्यांच्याकडून एकूण ३ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमल जप्त केला आहे. त्यांनी फैजपुर पोलीस स्टेशन येथील २ गुन्हे, रावेर पोलीस स्टेशन येथील २ गुन्हे, यावल पोलीस स्टेशन येथील २ गुन्हे, अडावद पोलीस स्टेशन येथील १ गुन्हा असे एकूण ७ गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---