⁠ 
सोमवार, एप्रिल 22, 2024

Muktainagar Accident : दोन मोटारसायकली समोरा-समोर धडकल्या, दोघे जागीच ठार

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ सप्टेंबर २०२३ । अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसत असून यात अनेकांना जीव गमवावा लागलाय. याच दरम्यान आता दोन मोटारसायकलींची समोरा-समोर झालेल्या धडकेत दोन जण ठार झाल्याची घटना मुक्ताईनगर शहराच्या नजीकच महामार्गावरील स्मशानभूमिच्या जवळ घडलीय.

दोन मोटारसायकलींची धडक झाली. हा अपघात इतका भयंकर होता की, यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, घटनेची वार्ता पसरताच परिसरातील लोकांनी येथे मोठी गर्दी केली. दरम्यान, या अपघातातील मयत दोघे हे मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड येथील रहिवासी असल्याचे समजतेय.

या अपघातात मृत झालेल्यांच्या आप्तांनी शासकीय रूग्णालयात केलेला आक्रोश पाहून वातावरण सुन्न झाले होते.दरम्यान शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या अपघाताच्या संदर्भात मुक्ताईनगर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.