भुसावळ

बकऱ्यांच्या कळपावर दोन बिबट्यांचा हल्ला; एका बकरीचा फडशा तर दुसरी बचावली

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जून २०२२ । भुसावळ, वेल्हाळे गावातील तलाव परीसरात अचानक दोन बिबट्यांनी दोन बकर्‍यांवर हल्ला चढवला. मात्र सुदैवाने एका बकरीने सुटका करून घेतली तर दुसर्‍या बकरीचा मात्र बिबट्याने फडशा पाडला. सोमवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. शेतात काम करीत असलेल्या मजुरांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी आरडा-ओरड केल्याने बिबट्यांनी पलायन केले तर भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे मजुरांच्या गोटात भीती पसरली आहे.


वेल्हाळे येथील शेतकरी सुभाष ठोके यांचा शेळी पालन व्यवसाय असून त्यांच्याकडील बकर्‍या तलावाजवळील शेतात मजूर चारत असताना सोमवारी दुपारी अचानक दोन बिबट्यांनी बकर्‍यांवर हल्ला चढवत दोन बकर्‍या तोंडात धरल्याने बकर्‍या आरडा-ओरड करू लागताच मजुरांनी आरडा-ओरड केली व एका बकरीने स्वतःची सुटका करून घेतली मात्र दुसर्‍या बकरीचा फडशा पाडण्यात बिबट्या यशस्वी झाला. बिबट्याच्या तोंडातून निसटलेल्या बकरीला मोठ्या प्रमाणावर मान, पाठ व कानांवर जखमा झाल्या आहेत.

Related Articles

Back to top button