जळगाव लाईव्ह न्यूज । २१ नोव्हेंबर २०२१ । चाळीसगाव – कन्नड रोडवरील सदिच्छा हॉटेल नजीक भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहे. हर्षल संतोष ठाकरे (वय-२८ रा. सांगवी ता. चाळीसगाव) व बोंबेदर कुमार उर्फ बॉबी खिलालाल सहा (वय-२२ रा. धनसनि भांदलगाव, राज्य उत्तराखंड) असे अपघातातील मृतांचे नाव आहे. ही घटना आज रविवारी सकाळी घडली असून याबाबत ग्रामीण पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महामार्गावरील चाळीसगाव – कन्नड रोडवरील सदिच्छा हॉटेल नजीक आज सकाळी अपघातात झाला. यात परप्रांतीयासह चाळीसगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. यातील हर्षल संतोष ठाकरे हा हॉटेलवर कामे करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. परंतु या घटनेने त्यांच्या घरावर डोंगर कोसळले आहेत.
ही घटना आज रविवार, २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली व पंचणामे केले. दरम्यान वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहेत.