---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

जळगावात दुचाकी आणि पिकअपमध्ये भीषण अपघात ; दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२५ । राज्यात अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून अशातच जळगाव तालुक्यातून भीषण अपघात घडलाय. ज्यात दुचाकी आणि पिकअपमध्ये झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज १० एप्रिल रोजी दुपारी वावडदा गावाजवळ घडली. भावेश गोरख पाटील (वय ३८), महेंद्र उर्फ योगेश वसंत जाधव (वय ३८, दोन्ही रा. पाथरी ता. जळगाव) असे मयत तरुणांचे नाव आहे.

vavada acd

या घटनेबाबत असे की, भावेश पाटील आणि महेंद्र जाधव हे गावातील संदीप शांताराम भील (वय ३५) याचेसोबत पाथरी येथून जळगाव येथे कामानिमित्त येत होते. याच दरम्यान, आज दुपारी १ वाजेच्या सुमारास वावडदा गावाजवळ समोरून येणाऱ्या पिकअप यांनी त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली.

---Advertisement---

या घटनेनंतर आजूबाजूच्या ग्रामस्थांनी भावेश पाटील, महेंद्र जाधव, संदीप भिल यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून भावेश पाटील आणि महेंद्र उर्फ योगेश जाधव यांना मयत घोषित केले. तर संदीप भिल हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावेळी मृतांच्या कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला होता.

दरम्यान भावेश पाटील खाजगी लक्झरी बसवर चालक म्हणून काम करीत उदरनिर्वाह करीत होता. त्यांच्या पश्चात आई आहे. तर महेंद्र जाधव टेलर काम करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment