जळगावात भरदिवसा घरफोडीचा थरार! दोन फ्लॅट फोडून लाखोंचा ऐवज लंपास

मार्च 18, 2026 12:18 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरात चोरट्यांचा उच्छाद सुरूच असून घरफोडीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अशातच महाबळ परिसरातील देवेंद्रनगरातील प्रमुख रस्त्यावर असलेल्या अपार्टमेंटमध्ये भरदिवसा चोरट्यांनी दोन फ्लॅट मध्ये डल्ला मारून मोठा ऐवज लंपास केला आहे.अपार्टमेंटमधील १० नंबरच्या फ्लॅटमधून २० हजारांची रोकड, १७ ग्रॅम सोन्याचे दागिने व ३४० ग्रॅम चांदीच्या वस्तू तर ३ नंबरचा फ्लॅट फोडून चोरट्यांनी ऐवज लंपास केला. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

chalisgaon gharfodi 44 thousand

याबाबत असे की, प्रितम प्रल्हाद साळुंखे (क्य ४०, रा. प्रभुस्पर्श अपार्टमेंट, देवेंद्रनगर, गाडगेबाबा चौक) हे विमा प्रतिनिधी आहेत. त्यांची पत्नीही कामाला आहे. तर मुलगी शाळेत जाते. सोमवारी दुपारी साडेबारा ते साडेचार या वेळात त्यांचा फ्लॅट बंद असताना चोरट्यांनी याच अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या फ्लॅट नंबर १०चा कडी-कोयंडा तोडून बेडरूमच्या कपाटातून रोकडसह ऐवज चोरून नेला. साळुंखे दुपारी घरी आल्यावर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

असा ऐवज चोरी?

प्रितम साळुंखे यांच्या फ्लॅटमधून चोरट्यांनी २० हजारांची रोकड, ७.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील तीन जोड, ६ ग्रॅम सोन्याची चेन, ३ ग्रॅम सोन्याच्या वाट्या, ३ ग्रॅमचे सोन्याचे पेंडल, ३ ग्रॅमचे सोन्याचे कानातील रिंग, १ ग्रॅमचे सोन्याचे क्वॉइन, ३४० ग्रॅम चांदीच्या वस्तू ज्यात चांदीची वाटी, चमचा, पायल, ६ क्वाइन असा एकूण ६६,७५० रुपयांचा ऐक्ज चोरट्यांनी लंपास केला आहे. या चोऱ्या दिवसा झाल्याने नागरिक धास्तावले.

एकाचे कुलूप तुटले नाही

अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नंबर श्मध्ये राहणारे धीरज ठाकरे हे बाहेरगावी गेलेले असल्याने त्यांचे घर बंद होते. त्यांचेही कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केली आहे. ते गावाहून परतल्यावर किती ऐवज लंपास केला हे स्पष्ट होईल. ठाकरे यांच्या शेजारील २ नंबरच्या फ्लॅटमध्येही चोरीचा प्रयत्न चोरट्यांनी केला. मात्र, त्यांचे कुलूप चोरट्यांकडून तुटले नाही. त्यामुळे फ्लॅट चोरी होण्यापासून बचावले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now