दिवाळीसाठी जळगावमार्गे आणखी दोन एक्स्प्रेस धावणार; कुठून कुठपर्यंत असेल?

ऑक्टोबर 20, 2025 10:34 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२५ । दिवाळी, छटपूजेसाठी रेल्वे प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वेनं जळगाव-भुसावळमार्गे आणखी दोन रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. उधना-भागलपूर-उधना आणि मालदा-उधना-मालदा या दोन गाड्या सुरु होणार आहे. विशेष या गाड्यांमुळे जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळाला.

train

०९०८१ उधना-भागलपूर अनारक्षित विशेष रेल्वे २७ ऑक्टोबरपर्यंत घावणार आहे. ही रेल्वे दररोज सकाळी ११:१५ वाजता उघना येथून निघेल आणि दुपारी ३.५५ वाजता जळगावात थांबा घेऊन भागलपूरसाठी रवाना होईल. त्याच वेळी, ०९०८२ भागलपूर-उधना अनारक्षित विशेष रेल्वे २८ ऑक्टोबरपर्यंत रोज सकाळी १०. ५० वाजता भागलपूरहून निघेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता उधना येथे पोहोचेल.

०३४१७ मालदा उघना विशेष ही मालदा येथून दुपारी १२.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.५५ वाजता भुसावळात थांबा घेईल. २५ ऑक्टोबर तसेच १ आणि ८ नोव्हेंबर रोजी धावणार आहे. तर ०३४१८ उधना-मालदा विशेष गाडी सोमवारी उधना येथून दुपारी १२.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.५५ वाजता भुसावळात थांबा घेईल. ही रेल्वे २१ आणि २८ ऑक्टोबर, ४ व ११ नोव्हेंबर रोजी धावणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now