---Advertisement---
जळगाव जिल्हा गुन्हे

जळगाव एसीबीची मोठी कारवाई ; लाच स्वीकारताना दोन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२५ । जळगाव जिल्ह्यातून आठवड्यातून एक तरी लाचखोरीची बातमी समोर येत असून अशातच वीस हजारांची लाच मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. यामुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

lach jpg webp

याबाबत असे की, शहर पोलीस स्थानकात एक गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील संशयिताला मदत करण्यासाठी वीस हजारांची लाच मागण्यात आली होती. हवालदार रवींद्र सोनार यांनी तक्रारदाराला ही लाच मागितली होती. त्या इसमाने याबाबतच जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार नोंदविली. एसीबीचे उपअधिक्षक योगेश ठाकूर यांनी सहकाऱ्यांचे पथक तयार करून सापळा रचला. काल रात्री दहाच्या सुमारास रवींद्र सोनार यांना वीस हजार रूपये स्वीकारतांना अटक करण्यात आली. या प्रकरणात अजून एका पोलीस कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून याबाबत तपासणी सुरू आहे.

---Advertisement---

दरम्यान, रात्री उशीरा याबाबत पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होत्ो. काही दिवसांपूर्वीच जळगावातील पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकले होते. या पाठोपाठ शहर पोलीस स्थानकातील कर्मचाऱ्याला अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात चौकशीतून नेमके काय समोर येणार ? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

1 thought on “जळगाव एसीबीची मोठी कारवाई ; लाच स्वीकारताना दोन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक”

  1. साधारण तक्रार देण्यासाठी साठी येथे कमीत कमी ६ तास लागतात
    (जर गप्पा पुर्ण झाल्या तर)

    माझा अनुभव आहे

    तरी सुद्धा नोंद नाही घेतली गेली

    घरी सोडून परत गलिच्छ भाषेचा वापर
    एका महिला कर्मचारी यांचा रात्रीचा प्रताप

Leave a Comment