भुसावळमध्ये भाजपचे खाते उघडले ; दोन नगरसेवक बिनविरोध

नोव्हेंबर 22, 2025 11:26 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ नोव्हेंबर २०२५ । नगर परिषदा आणि नगर पालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याची २१ नोव्हेंबर अखेरची तारीख होती. बऱ्याच उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यात भुसावळमध्ये दोन उमेदवारांची नगरसेवक पदी बिनविरोध निवड झाली. पिंटू कोठारी आणि अजय नागराणी यांच्या बिनविरोध निवडीमुळे भाजपने आपले खाते उघडले यांनतर शहरातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे.

bhusawal palika

अधिकृत घोषणा मंगळवार (दि.25) रोजी होणार असली तरी सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याने या दोन नगरसेवकांचा विजय निश्चित मानला जातो आहे.

Advertisements

माघारीच्या शेवटच्या दिवशी अनेकांनी अर्ज मागे घेतले. काही इच्छुक संपर्कात न राहिल्याने या प्रक्रियेबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगल्या. शेवटच्या क्षणी झालेल्या या उलटफेरामुळे संपूर्ण शहरात उत्सुकता निर्माण झालेली दिसून आली. नगराध्यक्षपदासाठीही दोन महत्त्वाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. यामुळे या पदाची लढत आता अधिक स्पष्ट झाली आहे. कोणाला याचा फायदा मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. या सगळ्या घडामोडींनी भुसावळच्या निवडणुकीला अनपेक्षित वळण मिळाले आहे.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now