⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणाऱ्या दोघा लिपिकांना अटक, ६८ हजारहून अधिकची रेल्वे तिकीट जप्त!

रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणाऱ्या दोघा लिपिकांना अटक, ६८ हजारहून अधिकची रेल्वे तिकीट जप्त!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२२ । रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करण्यासाठी दलालास मदत करीत असलेल्या रेल्वेच्या मुख्य वाणिज्य लिपिकाला भुसावळ मंडळमधील जळगावच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी रात्री १२ वाजता जामनेर रेल्वेस्थानकावर करण्यात आली. दरम्यान, दोघांच्या ताब्यातून 68 हजार 535 रुपये मुल्य असलेले 14 रेल्वे तिकीट मिळून आले.

चंद्रकांत प्रताप पाटील (वय 37, रा. नगरदेवळा, ता. पाचोरा) असे पकडल्या गेलेल्या लिपीकाचे तर सिद्धार्थ सुरेश सोनवणे (वय 25, रा. रेल्वे कॉलनी, जामनेर) असे संशयित दलालाचे नाव आहे.  चंद्रकांत पाटील याची नियुक्ती जामनेर रेल्वेस्थानकवर असून तो अनुकंपा तत्त्वावर नोकरील लागला आहे. त्याची जामनेर स्थानकावर रेल्वेचे तिकीट बुकींग काऊंटरच्या ठिकाणी नियुक्ती आहे. या ठीकाणच्या काही प्रवाशांनी जळगाव स्थानकावरील रेल्वे सुरक्षा बलाकडे तक्रार आरक्षण उपलब्ध असूनही नकारदेण्यासह इतर बाबत तक्रार केली होती.

या तक्रारीची शहानीशा पटल्यानंतर सोमवारी रात्री भुसावळ आरपीएफचे मंडळ सुरक्षा आयुक्त क्षितिज गुरव यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील, उपनिरीक्षक मनोज सोनी, परीक्षित वानखेडे, किरण पाटील, विनोद जेठवे यांच्या पथकाने साध्या गणवेशात जाऊन जामनेर रेल्वेस्थानकावर सापळा रचला. एका कर्मचाऱ्याने प्रवासी असल्याचे सोंग घेऊन आरक्षणाचे तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

दलाल उपलब्ध होतो का? याची चौकशी केली. काही वेळातच त्यांना सिद्धार्थ सोनवणे याने प्रतिसाद देत तिकीट मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी लिपीक चंद्रकांत पाटील यांची मदत सिद्धार्थ याने घेतली. ही प्रक्रीया पूर्ण होताच पथकाने चंद्रकांत पाटील याच्या दालनात प्रवेश करुन त्याला रंगेहात पकडले. यावेळी दोघांच्या ताब्यातून 68 हजार 535 रुपये मुल्य असलेले 14 रेल्वे तिकीट मिळून आले. या तिकीटांसाठी संबधित व्यक्तींकडून सिद्धार्थ याने मागणीपत्र तयार केले होते. सापळा यशस्वी झाल्यानंतर चंद्रकांत पाटील व सिद्धार्थ साेनवणे या दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील तपास करीत आहेत. दरम्यान, सिद्धार्थ याने मागणी केल्यानंतर चंद्रकांत पाटील तिकीट काढून ठेवायचा. नंतर तिकीटाचा फोटो सिद्धार्थला व्हाटसऍपवर पाठवून नंतरच सिद्धार्थ त्याला पैसे देत होता. तसेच कमिशनचे पैसे न मिळाल्याचे चंद्रकांत पाटील संबधित तिकीट स्वत:जवळच ठेऊन घ्यायचा, अशीही माहिती सिद्धार्थने पोलिसांना चौकशी दरम्यान दिली आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह