---Advertisement---
रावेर

धामोडी शिवारात बिबट्यासह दोन बछडे दिसली, शेतमजूर भितीने परतले घरी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । सादिक पिंजारी । रावेर तालुक्यातील खिर्डी येथून जवळ असलेल्या धामोडी शिवारात बिबट्यासह दोन बछडे असल्याचे शेतकरी माणिक रामा पाटील यांना शेतात सकाळी कामावर आल्यावर दिसले. बिबट्या आणि बछडे दिसल्याची माहिती त्यांनी ग्रामस्थांना दिल्याने शेतमजूर भितीने माघारी परतले.

two calves with leopard were seen in dhamodi

शेतकरी माणिक रामा पाटील यांना सकाळी आपल्या हरभरा, केळी असलेल्या शेती परिसरात दोन लहान पिले व एक मोठा बिबट वावर करतांना दिसल्याने परिसरातील इतर शेतकऱ्यांना माहिती दिली. त्यामुळे कामावर असलेल्या महिला मजूर शेतकरी आपले साहित्य घेवून भीतीने घरी परतले. घटनेची माहिती रावेर वनविभाग यांना दिली असता वनपाल अतुल तायडे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पथकावर पगमार्ग बघितले असता तो बिबट असल्याचे प्राथमिक माहितीत समजले मात्र नर किंवा मादी असल्याचे कोणताही अंदाज लावता आला नाही.

---Advertisement---

दरम्यान, यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने शेतकऱ्यांनी शेतात जावे की नाही असा प्रश्न व्यक्त केला जात आहे. पाच दिवसापूर्वी दोन किमी अंतरावर कांडवेल शेती शिवारात बिबट्याने दोन बोकड फस्त केले होते. सदर गावात एकच चर्चा असल्याने वाघ आला, पळा पळा असा उदघोष सगळ्यांच्याच तोंडी होता. तापी नदीच्या किनारी गावामध्ये उन्हाळ्याची चाहूल लागताच हिंस्त्र प्राणी शेती शिवारात वास्तव करत असतात. पुरी, गोलवाडे, कांडवेल , धामोडी, शिंगाडी या परिसरात वन्य प्राणी शेती पिकाचे नुकसान करतात. वनविभागाने याबाबत कोणतीही जनजागृती केलेली दिसत नाही.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---