⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | महापालिकेचा कर न भरल्याने जळगावात दोन बीएसएनएल टॉवर सील

महापालिकेचा कर न भरल्याने जळगावात दोन बीएसएनएल टॉवर सील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२१ । जळगाव शहरातील सिध्देश्वर नगर आणि दांडेकर नगरातील दोन बीएसएनएल टॉवर सील करण्यात आले आहे. वारंवार नोटीस बजावूनही कर न भरल्याने आज महापालिकेच्या वसुली पथकाने धडक कारवाई करत दोन्ही टॉवर सील केले आहे.

महानगरपालिकेच्या प्रभास समिती क्रमांक ४ च्या अंतर्गत असलेलया वसुली पथकाने आज सर्वप्रथम सिध्देश्वर नगरातील प्लॉटनंबर ७ वरील भोगवटादार संजय भागवत पाटील यांच्या इमारतीवरूरील मोबाईल टॉवरवर ५ लाख ५८ हजार ८६९ रक्कम येणे बाकी होते. तर याच पथकाने शहरातील दांडेकर नगर परिसरातील भोगवटादार गणेश कदम यांच्या जय मातादी अपार्टमेंटवरील बीएसएनएल टॉवरवर ६७ हजार ८१५ रक्कत वसुलचे बाकी होते. वारंवार नोटीस बजावूनही कर न भरल्याने आज दोन्ही टॉवर सील केले आहे.

वसुली पथकात प्रभाग अधिकारी उदय पाटील, कर अधीक्षक इंद्रजीत सिंह पाटील, मनिराम भोये, कुमार कुलकर्णी, जितेंद्र सोनवणे, महेंद्र पाटील, संजय सपकाळे, अनंत जावळे यांनी कारवाई केली.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.