⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | चाळीसगाव | चाळीसगात सापडले बाबासाहेब आंबेडकरांचे २ अस्थी कलश

चाळीसगात सापडले बाबासाहेब आंबेडकरांचे २ अस्थी कलश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२१ । चाळीसगाव शहरातील डॉ आंबेडकर चौकात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा नूतनीकरण करताना उत्खननात पुतळ्याखाली डॉ बाबासाहेब यांचे 1958 या वर्षाचे 2 अस्थीकलश मिळाले असून त्या अस्थीकलशाचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील समाज बांधवांनी मोठी गर्दी केली होती. याठिकाणी तहसीलदार अमोल मोरे, पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, स पो नि विशाल टकले, निसार सैय्यद, गोपनीय शाखेचे गणेश पाटील, तलाठी यांनी भेट देऊन माहिती घेतली.

चाळीसगाव शहरात नगरसेविका सौ सायली रोशन जाधव यांच्या प्रयत्नातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे नूतनीकरण सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून त्याठिकाणी काम सुरू आहे. आज दि 22 जुलै रोजी दुपारी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याखाली उत्खनन सुरू असताना जवळपास 10 फूट खाली काँक्रीट मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची अस्थी असलेले 2 अस्थीकलश मिळून आले ही माहिती नगरसेविका सायली जाधव, रोशन जाधव, समता सैनिक दलाचे धर्मभूषण बागुल, माजी आमदार साहेबराव घोडे, नगरसेवक रामचंद्र जाधव, बबलू जाधव, गौतम जाधव आदी समाज बांधव त्याठिकाणी येऊन विधीवत पूजन करून अस्थीकलश बाहेर काढले एका अस्थी कलशावर इंद्रायणीबाई पुंडलिक वाघ सायगाव व दुसऱ्या कलशावर डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती चाळीसगाव असा उल्लेख आहे.

यावेळी समता सैनिक दलाचे धर्मभूषण बागुल यांनी सांगितले की त्यांचे वडील स्वातंत्र्य सैनिक भगवान बागुल यांनी एका पेपरचे कात्रण दाखवून माहिती दिली होती की 6 डिसेंबर 1956 रोजी  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले 9 डिसेंबर रोजी अंत्यसंस्कार झाले व 10 डिसेंबर रोजी क्रांतीसुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात जमलेल्या हजारो लोकांनी तेव्हा मुंडन केले होते.

त्यात चाळीसगाव येथील शामाजी जाधव, सीताराम चव्हाण व चाळीसगाव येथील भिम अनुयायी यांनी हे अस्थीकलश चाळीसगावी आणले व 1958 साली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा झाला त्यावेळी अस्थीकलश पुतळ्याच्या पायथ्याखाली ठेवले होते ते आज उत्खनन करताना मिळून आले आहे हे अस्थीकलश नवीन जागेवर पुतळ्याखाली विधीवत पूजन करून ठेवणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.