Sawada News-जळगाव लाईव्ह न्यूज । दीपक श्रावगे । सावदा येथील सावदा कोचुर रस्त्यावर आज गुरुवारी १२ वाजेच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात एक जागीच ठार झाला तर दोन जखमी झाले असून फैजपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

सावदा कोचूर रस्त्यावरील मोरी जवळील वळणावर आज दुपारी साडे अकरा ते बारा वाजेच्या सुमारास एम एच’ १५ डी.व्ही १३०६ आणि एम एच १९ डी.जी ८४६७ क्रमांकांच्या मोटार सायकलींची समोरासमोर जेरदार धडक झाली. यात कुणाल मधुकर साळी (सावदा ) याचा मृत्यू झाला असून यश किशोर धांडे आणि पुष्कर हेमा बढे दोन्ही राहणार चिनावल हे दोन जण जखमी झाले आहेत.
त्यांना फैजपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून पुढील तपास सावदा पोलीस करीत आहे. ठार झालेला कुणाल साळी हा महावितरण मध्ये नोकरीला होता. त्याचे पश्चात पत्नी, आई, वडील असा परीवार असून अतीशय सुस्वभावी असलेल्या कुणाल याचे अपघाती मृत्यू झाल्याने त्याचे राहते घरी व परीसरात एकच शोककळा पसरली आहे.