गुन्हेजळगाव जिल्हा

टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार दोन तरुण ठार, नशिराबादजवळील घटना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२३ । महामार्गावर होणारे अपघाताचे प्रमाण वाढतच असल्याचे दिसून येतेय. अशात पुन्हा एका भीषण अपघातात २ जणांचा मृत्यू झाला आहे. नशिराबाद गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर आईलने भरलेल्या टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील दोन जण ठार झाल्याची घटना रविवारी २६ मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली आहे. संदीप मानसिंग शिरसाम वसंत मुन्ना वरखेडे (दोन्ही राहणार धमण्या, बैतुल मध्यप्रदेश) असे मृतांचे नाव आहे. दरम्यान, अपघातामुळे महामार्गावरील दोन्ही वाहनांची वाहतूक खोळंबली होती.

नेमकी काय हे घटना?
दुचाकी क्रमांक (एमपी ४८ एमआर ५३९७) वरील संदीप मानसिंग शिरसाम वसंत मुन्ना वरखेडे हे रविवारी २६ मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास जळगाव शहराकडून भुसावळकडे जात होते. त्यावेळी नशिराबाद गावाजवळ एका भरधाव वेगाने येणारे आईल टँकर (एमएच ०४ डीएस २२१७) ने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघे. अपघात घडल्यानंतर नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

या अपघातमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही वेळ खोळंबली होती. अपघातातील मृतांचे मृतदेह जळगाव येथील शासकीय महाविद्यालयात आणण्यात आले आहे, या घटनेबाबत नशिराबाद पोलीस पुढील कारवाई करत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button