⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

Bhusawal : 12 हजार रुपयाची लाच घेताना कोतवालासह दोघे जाळ्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२३ । जळगाव जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. आठवड्यातून एक-दोन तरी कारवाई होत आहे. याच दरम्यान, आता शेतीची नोंद सातबारा उतार्‍यावर घेण्यासाठी 12 हजारांची लाच मागून ती पंटरामार्फत स्वीकारणार्‍या कोतवालासह दोघांना जळगाव एसीबीने भुसावळ तहसील कार्यालयातून अटक केली आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

याबाबत थोडक्यात असे की, भुसावळ तालुक्यातील तक्रारदाराच्या शेतीची नोंद सातबारा उतार्‍यावर घेण्यासाठी 12 हजार रुपये लाच मागून ती स्वीकारणार्‍या कोतवाल रवींद्र धांडे यास एसीबीने अटक केली शिवाय खाजगी इसमासही ताब्यात घेण्यात आले. विशेष म्हणजे मंडळाधिकार्‍यांच्या नावाने लाच घेण्यात आल्याने मंडळाधिकार्‍यांच्या अडचणी वाढल्या आहेत. जळगाव एसीबीचे निरीक्षक संजोग बच्छाव व सहकार्‍यांनी हा सापळा यशस्वी केला.