जळगाव लाईव्ह न्यूज । रेल्वेत हेड क्लर्कची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून ९ लाख ६४ हजारांत फसवणूक प्रकरणात प्रशांत लक्ष्मीनारायण अग्रवाल (रा.गडकरी नगर, भुसावळ) याला अटक झाली होती. तपासात या प्रकरणात अजून चार संशयित निष्पन्न झाले. पैकी दोघांना अटक तर दोघे पसार झाले.

आरोपींच्या विरोधात अन्य ८ तक्रारदार पुढे आल्यानंतर फसवणुकीचा आकडा २५ लाखांवर पोहोचल्याचे तपासाधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणी प्रशांत अग्रवाल यास अटक करण्यात आली. त्याला सुरूवातीला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. २५ रोजी मुक्त संपल्यानंतर न्यायालयात हजर केल्यानंतर पुन्हा २९ पर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.
या प्रकरणात हर्षांनी मेहता (गोलाणी कॉम्प्लेक्स, भुसावळ), प्रशांत अग्रवालचा शालक राजवीर मोहन परदेशी (भुसावळ), मेघराज नारायणसिंग पाटील (साकरी, ता. भुसावळ), योगेश केशवप्रसाद तिवारी (सरस्वती नगर, भुसावळ) यांनाही सहआरोपी करण्यात आले. यापैकी मेघराज पाटील व योगेश तिवारी यांना अटक करण्यात आली. पाटील याला २८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी, तर तिवारी याला न्यायालयीन कोठडी मिळाली.