⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

क्या बात है! TVS ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लाँच ; किमती फक्त इतकी..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मे २०२४ । भारतात सध्या इलेक्ट्रिक स्कूटरला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. जर तुम्हीही बजेटवाली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आहे. दिग्गज दुचाकी कंपनी TVS ने बाजारात आपल्या प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर iQube चा सर्वात स्वस्त प्रकार लॉन्च केला आहे. यामध्ये 2.2kWh ची बॅटरी आहे.

या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरुम किंमत 94,999 रुपयांपासून सुरु होते. बजेटच्या हिशोबाने ही इलेक्ट्रिक स्कूटर अनेक खास फीचर्स आणि रेंजसह मिळते. लॉन्च करण्यासोबतच कंपनीने त्याची बुकिंगही सुरू केली आहे. हे कंपनीच्या अधिकृत डीलरशिप किंवा वेबसाइटवर देखील बुक केले जाऊ शकते.

टीव्हीएसची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर केवळ 2 तासात 0 ते 80 टक्के चार्ज होते. याशिवाय नवीन इलेक्ट्रिक स्कूटरची सर्वाधिक गती ताशी 75 किमी आहे. TVS आयक्यूब 2.2kWh मॉडल दोन रंगात उपलब्ध आहे. यामध्ये वालनट ब्राऊन आणि पर्ल व्हाईट हे दोन रंग उपलब्ध आहेत.

नवीन व्हेरिएंट शिवाय TVS iQube ST ची डिलिव्हरीची पण घोषणा करण्यात आली आहे. आता हे मॉडल दोन व्हेरिएंट- 3.4kWh आणि 5.1kWh मध्ये येते. याची किंमत क्रमशः 1.55 लाख रुपये आणि 1.83 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

TVS iQube ST : बॅटरी आणि रेंज
टीव्हीएस आईक्यूब एसटी 3.4kWh व्हेरिएंटची रिअल वर्ल्ड रेंज 100 किलोमीटर आहे. याचा अर्थ एकदा फुल चार्ज झाल्यावर ही स्कूटर 100 किलोमीटरचा पल्ला गाठते. सर्वात शक्तीशाली मॉडल 5.1kWh बॅटरीसह येते. सिंगल चार्जमध्ये ही स्कूटर 150 किलोमीटर धावेल. तर 5.1kWh मॉडल 4 तास आणि 18 मिनिटात 0 ते 80 टक्के चार्ज होते.

TVS iQube ST : फीचर्स
टीव्हीएस आयक्यूब एसटीमध्ये अनेक फीचर्स आहेत. यामध्ये 7 इंचाची कलर TFT टचस्क्रीन डिस्प्ले, TPMS, कनेक्टेड फीचर्स आणि 32 लिटरचा बूट स्पेस मिळते. 5.1kWh व्हेरिएंटचा टॉप स्पीड ताशी 82 किलोमीटर आहे. तर 3.4kWh व्हेरिएंट ताशी 78 किलोमीटर धावते. हे इलेक्ट्रिक स्कूटर कॉपर ब्राँझ मेटे, कोरल सँड सेटिन, टाइटेनियम ग्रे मेटे आणि स्टारलाइट ब्लू या पर्यायात उपलब्ध आहे.