⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | जळगावमधील टीव्ही ९ मराठीचे पत्रकार अनिल केऱ्हाळे यांचं निधन

जळगावमधील टीव्ही ९ मराठीचे पत्रकार अनिल केऱ्हाळे यांचं निधन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगावमधील टीव्ही ९ मराठीचे पत्रकार अनिल दत्तात्रय केऱ्हाळे (वय ५०) यांचे मंगळवारी मुंबईत निधन झाले. त्यांच्यांवर मुंबईतील रुग्णालयात १५ दिवसांपासून उपचार सुरु होते. उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत जळगावात दाखल होणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, तीन बहिणी, दोन भाऊ असा परिवार आहे.

अनिल केऱ्हाळे यांनी महाविद्यालयात असतानाच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम सुरु केले. परिषदेच्या अनेक आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला होता. तसेच वनवासी कल्याण आश्रमाचे त्यांनी काम पाहिले. गेल्या २५ वर्षांपासून ते पत्रकारितेत कार्यरत होते. या दरम्यान त्यांनी विविध सामाजिक व राजकीय विषयांवर बातमीदारी केली.

अनिल केऱ्हाळे शांत आणि मनमिळाऊ स्वभावाचे होते, त्यांच्या अचानक जाण्यामुळे, जळगावातील त्यांचे पत्रकार मित्र आणि Tv9 मराठी परिवार हळहळला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.