⁠ 
मंगळवार, मार्च 5, 2024

सावधान ! iPhone 15 च्या माध्यमातून फसविण्याचा प्रयत्न ; लोकांना पाठवला जातोय ‘हा’ संदेश

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२३ । iPhone 15 लॉन्च झाल्यापासून चर्चेत असून लोकांमध्ये आयफोनची प्रचंड क्रेझ आहे. ऍपल उत्पादने खूप महाग आहेत परंतु असे असूनही लोक ते त्वरित खरेदी करण्यास उत्सुक आहेत. आता हीच क्रेझ Apple च्या नवीन iPhone 15 साठी देखील पाहायला मिळत आहे. दरम्यान, लोकांना iPhone 15 मोफत मिळवण्यासाठी मेसेजही येत आहेत, त्यामुळे लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

iPhone 15 ची सुरुवातीची किंमत 79,900 रुपये आहे. अशा परिस्थितीत, प्रत्येक व्यक्ती ते खरेदी करू शकत नाही. मात्र अशात iPhone 15 चे आमिष दाखवले जात आहे. iPhone 15 च्या माध्यमातून लोकांना फसविण्याचा प्रयत्न केला जात आहे. फसवणूक करणारे इंडिया पोस्टची मदत घेत आहेत आणि लोकांना बक्षीस म्हणून iPhone 15 देऊन आमिष दाखवले जात आहे.

यासंदर्भातील एक मेसेजही व्हायरल होत आहे. ज्याचा स्क्रीनशॉट इंडिया पोस्टने आपल्या X हँडलवर शेअर केला आहे. या स्क्रीमशॉटमध्ये असे दिसते की फसवणूक करणारे आयफोन 15 बक्षीस म्हणून देण्याचे आमिष दाखवत आहेत आणि हा संदेश 5 ग्रुप किंवा 20 मित्रांसह शेअर करण्यास सांगितले जात आहे. त्यानंतर बक्षिसाचा दावा करण्यासाठी Continue वर क्लिक करा असे लिहिले आहे.

तथापि, हा स्क्रीनशॉट शेअर करताना इंडिया पोस्टने लिहिले की, ‘कृपया सावध रहा! इंडिया पोस्ट कोणत्याही अनधिकृत पोर्टल किंवा लिंकद्वारे कोणत्याही प्रकारची भेट देत नाही. इंडिया पोस्टशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी, कृपया अधिकृत वेबसाइटचे अनुसरण करा.