जळगाव लाईव्ह न्यूज । १ जानेवारी २०२२ । जामनेर तालुक्यातील वाकोद येथील आड नदीच्या पुलाजवळ ट्रकचालकाला तिघांनी लुटल्याची घटना ३० रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी पहूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
मुकेश सोलंकी (वय २७, रा.उमाळा, ता.जळगाव) हा आयशरचालक (क्र.एम.एच.१९-सी.वाय.६३८६) जालना येथून जळगावकडे जात होता. वाटेत आड नदीच्या पुलाजवळ, विना नंबरप्लेटच्या काळ्या पल्सर दुचाकीवर आलेल्या तीन संशयितांनी दुचाकी आयशरसमोर आडवी लावून ट्रक थांबवली. हमको कट क्यू मारा, असा जाब विचारत तिघांनी ट्रकचालकाचे १६ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल हिसकावून घेतले. घटनेनंतर तिघे संशयित पसार झाले, अशी आपबिती ट्रकचालक सोलंकी याने सांगितली. जबरी चोरीच्या उद्देशाने सोळा हजार किंमतीचे दोन मोबाईल तीन अनोळखी इसमांनी जबरीने काढून घेतले.सदर रिकामी गाडी आयशर एम.एच.१९ सी.वाय.६३८६ जालना परतुर येथून जळगाव कडे जात असताना वाकोद जवळील आड नदीच्या पुलाजवळ गाडीच्या मागे विना नंबर प्लेट काळ्या रंगाच्या बजाज पलसर वरून तीन इसमांनी आयशर समोर मोटार सायकल आडवी करून हमको कट मारता क्या असे म्हणून सोळा हजार किंमतीचे दोन मोबाईल हिसकावून घेतल्याची आपबीती मुकेश सोलंकी यांनी सांगितले.
याप्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी डीवायएसपी भारत काकडे यांनी पाहणी केली. पोलिस निरीक्षक अरुण धनवडे पुढील तपास करत आहेत. वर्दळीच्या मार्गावर ट्रकचालकाला लुटल्याची घटना घडल्याने, या मार्गावरून नेहमी ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
हे देखील वाचा :