⁠ 
सोमवार, एप्रिल 22, 2024

मद्यधुंद ट्रक चालकाचा थरार ; एसटीसह तीन ते चार दुचाकींना धडक

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जानेवारी २०२३ । मद्यधुंद चालकाने भरधाव ट्रक चालवून एसटीसह तीन ते चार दुचाकींना धडक दिली. हा संपूर्ण थरार सोमवारी दुपारी आठवडे बाजार ते शासकीय तांत्रिक महाविद्यालयादरम्यान घडला. दरम्यान, नागरिकांनी ट्रक चालकाचा पाठलाग करून त्याला चांगलाचा चोप दिला. त्यामुळे रस्त्यावर बघ्यांची प्रचंड गर्दी जमली होती.

मद्यधुंद अवस्थेत एक चालक ट्रक (एमएच.३४.एव्ही.१४५३) चालवत आठवडे बाजारकडून शिवतीर्थ मैदानाकडे येत होता. या रस्त्यावर त्याने सुरूवातीला रिव्हर्स घेताना एसटीला धडक दिली. त्यानंतर भरधाव ट्रक चालवत तीन ते चार दुचाकींना धडक दिली. काही दुचाकीधारकांनी ट्रक चालकाला शासकीय तांत्रिक महाविद्यालयाजवळ ट्रक अडवून चालकाला चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सुदैवाने या थरारात कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र, एसटीचे किरकोळ नुकसान झाले. महाविद्यालयाजवळ ट्रक थांबविल्यानंतर नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती.