जळगाव लाईव्ह न्यूज । अमोल महाजन । चोपडा तालुक्यातील धानोरा येथील देवगाव जळगाव रत्यावरील वळण रत्यावर चोपडा कडून येणाऱ्या आयशर ट्रकने जळगांव कडून येणाऱ्या प्रवासी वाहतूक मक्झिमो गाडीला जोरदार समोरासमोर धडक दिल्याने मक्झिमो गाडीतील ७ प्रवाशी गंभीर जखमी झाले. त्यांना धानोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर जखमींना १०८ रुग्णवाहिकेने जळगाव येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.
तालुक्यातील धानोरा येथून जवळच जळगाव रस्त्यावरील हॉटेल कलर गार्डन जवळील वळण रस्त्यावर दुपारी १२ ते १ वाजेच्या सुमारास जळगावहुन प्रवासी वाहतूक करणारी मॅक्झिमो गाडी क्रमांक एमएच १९ बीयु ४९७७ तसेच चोपड्यातून जळगांव कडे जाणारी आयशर ट्रक क्रमांक एचआर ६३ यु ४७४७ या दोघा वाहनांची वळण रस्त्यावर समोरासमोर जोरदार धडक झाल्याने प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये असलेले प्रवासी गंभीर रित्या जखमी झाले आहेत. यात मनोज गवळी (वय ३५),घनश्याम आडळकर (वय ३८) नितीन सोनवणे (वय ४९) जळगाव, श्रीराम सुरेश (वय ४५), बन्सी सुरेश (वय ३८) रा.धवली म. प्र., शोभा आढळके (वय ३३)हुडको असे जखमी झालेल्यांचे नावे असून जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र धानोरा येथे वैद्यकीय अधिकारी डॉ.उमेश कवडीवाले, आरोग्य सेविका भारती सोनवणे यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेने जळगाव येथे पाठविण्यात आले. घटनास्थळावरून आयशर ट्रक चालक व क्लिनर पसार झाले. यावेळी अडावद पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली. याबाबत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु आहे.
तरुणांची तत्पर सेवा
घटनास्थळावरून जखमींना शेख शेख अल्ताप शेख हमीद, शेख जुनेद शेख सलीम, ज्ञानेश्वर सोनवणे, राजेंद्र पाटील,पिंटू कोळी वैभव सपकाळे, भूषण कोळी यांनी क्षणाचाही विलंब न करता जखमींना गाडीतुन अक्षरशः दोराच्या सहाय्याने ताणून काढून तात्काळ समीर शेख जैनुद्दीन यांच्यातीनचाकी मालवाहतूक रिक्शा मध्ये टाकून धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.