जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२२ । पिंपळगाव गोलाईत जवळ झालेल्या तिहेरी अपघातात तरूण फोटोग्राफरचा जागीच मृत्यू झाला तर पाळधी येथील एक तरूण अत्यवस्थ असून अन्य तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली.
अधिक माहिती अशी की, जामनेर ते पहूर रस्त्यावरील पिंपळगाव गोलाईत जवळ बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास दोन दुचाकी व एका ट्रक (एमपी- ६८, सी- ३६५१) चा विचित्र अपघात झाला. यात पिंपळगाव गोलाईत येथील तरूण फोटोग्राफर सुशांत सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला. तर अजय पाटील हा पाळधी येथील तरूण अत्यवस्थ आहे. तर अपघातातील शेख अर्शद शेख हरूण, समीर शेख जाकीर यांच्यासह आणखी एक असे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जळगावला हलवले आहे.