⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | श्रद्धांजली सभा : सिंधुताई सपकाळ या मातृहदयाच्या करुणा सागर होत्या

श्रद्धांजली सभा : सिंधुताई सपकाळ या मातृहदयाच्या करुणा सागर होत्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जानेवारी २०२२ । शेकडो अनाथांना मायेची सावली देणाऱ्या मातृहद्दी सिंधुताई सपकाळ यांच्या सेवाव्रती कार्याचा अव्याहतपणे पुढे नेण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचा संकल्प जनसेवा विचारधारा फाऊंडेशनने आयोजित केलेल्या श्रद्धांजली सभेत विविध संस्था व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. आदरांजली अर्पण करण्यासाठी डॉ.शामाप्रसाद मुखर्जी उद्यानात जनसेवा विचारधारा फाऊंडेशनच्या वतीने श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते.

श्रद्धांजली सभेत संविधान जागर समितीचे संयोजक भारत ससाणे, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील, बाराबलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष किशोर सुर्यवंशी, महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे हरिश्चंद्र सोनवणे, माजी नगरसेवक सुनिल माळी, बुलंद छावा संघटनेचे प्रमोद पाटील, मराठा छावा संघटनेचे अमोल कोल्हे, विद्रोही कवी वसंततात्या सपकाळे, शिववंदन फाऊंडेशनचे उपाध्यक्ष विशाल वाघ, मनोज भांडारकर, भारत मुक्ती मोर्चा जिल्हा सचिव विजय सुरवाडे, आधार जेष्ठ नागरीक संघाचे सचिव कवि प्रकाश पाटील, अन्याय अत्याचार केंद्राचे उमाकांत वाणी, भाऊलाल राठोड आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या मनोगतातून सिंधुताई सपकाळ यांना आदरांजली अर्पण केली.

श्रद्धांजली सभेचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन जनसेवा विचारधारा फाऊंडेशनचे अध्यक्ष निलेश बोरा यांनी केले. यावेळी प्रमोद घुगे, गुलाबराव देशमुख, सैय्यद युसुफअली, वाल्मिक सपकाळे, मुकेश कुरील, प्रदिप पाटील, लक्ष्मण पाटील, कमलाकर इंगळे, चित्रनिश पाटील, दत्तात्रय जोशी, शेखर देशमुख, हरिष कुमावत, विनय निंबाळकर, चेतन जाधव, समीर सोनवणे, रविंद्र मोरे, गणेश आमोदकर, जगन्नाथ मावळे, सुभाष सपकाळे, दिलीप अहिरे आदी या श्रद्धांजली सभेत उपस्थित होते.

हे देखील वाचा :

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.