जळगाव लाईव्ह न्यूज । २ जुलै २०२२ । अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे रविवार, ३ जुलै रोजी वृक्ष दिंडी व पर्यावरण बचाव लोकचवळ भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. अनिल पाटील, तर उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत असतील. आ. डॉ.बी.एस. पाटील, मा. आ. कृषिभूषण पाटील, मा. आ. शिरीष चौधरी,मा. आ. स्मिता वाघ, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, जि. प. सदस्या जयश्री पाटील, पं. स. सभापती श्री. त्रिवेणा अहिरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, मिरा- भाईंदर महापालिकेचे उपायुक्त अजित मुठे, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव हे विशेष अतिथी उपस्थित असणार आहे. यावेळी अमळनेरसह परिसरातील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आदी क्षेत्रांतील अनेक मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणार आहे.
सकाळी ८ वाजता धुळे रोडवरील साने गुरुजी विद्यामंदिराच्या प्रांगणातून वृक्ष दिंडी व पर्यावरण बचाव लोकचळवळ रॅलीचा प्रारंभ होईल. तसेच याच सोहळ्यात ५००० गरजू विद्यार्यांना सेलो कंपनीच्या वॉटर बॉटल्सचेही मोफत वाटप होईल. पर्यावरणविषयक जनजागर प्रसंगी पर्यावरणप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे करण्यात आले आहे. असा असेल रॅली मार्ग स्टेशन रोड-नगरपालिका-सुभाष चौक-राणी लक्ष्मीबाई चौक-सराफ बाजार- पानखिडकी -वाडी चौक- वाड़ी चौका मागील बोरी नदीच्या पात्रात रॅलीची इत्यादी ठिकाणी रॅलीचे आयोजन आहे.