⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | रावेर | Trap : १५ हजारांची लाच अंगलट, एपीआयसह पीएसआय जाळ्यात

Trap : १५ हजारांची लाच अंगलट, एपीआयसह पीएसआय जाळ्यात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ नोव्हेंबर २०२२ । सावदा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या पोस्कोच्या गुन्ह्यात संशयीत आरोपीच्या कुटुंबियांना आरोपी न करण्यासाठी तडजोडीअंती 15 हजारांची लाच मागणी करणे सावद्यातील सहाय्यक निरीक्षकांसह उपनिरीक्षकांना चांगलेच महागात पडले आहे. जळगाव एसीबीने लाच मागणी प्रकरणी सहाय्यक निरीक्षक देविदास दादाराव इंगोले (52, रा.सावदा, ता.रावेर) व उपनिरीक्षक समाधान गायकवाड (32,
रा.सावदा, ता.रावेर) यांना मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास राहत्या घरातून अटक केल्याने जिल्हा पोलिस दलातील लाचखोर कर्मचार्‍यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

संशय आल्याने स्वीकारली नाही लाच
जळगाव तालुक्यातील 42 वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा आकाश कुमावतविरोधात सावदा पोलिसात अल्पवयीन मुलीस पळवून नेत अत्याचार केल्याप्रकरणी गुरनं.0136/2022 भादंवि 363, 376 (2), (एन) पोस्को व कायदा कलम 4 अन्वये 24 जुलै 2022 रोजी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात आकाश यास 27 ऑगस्ट 2022 रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर तक्रारदार हे आपल्या मुलास भेटण्यासाठी सावदा पोलिसात गेल्यानंतर संशयीत आरोपी पोलिस उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांनी मुलीला तुमच्या घरी आणल्याने तुम्हाला या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी 30 ऑगस्ट रोजी 60 हजारांची पंचांसमक्ष लाच मागितली होती मात्र 15 हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर संशय आल्याने लाच स्वीकारण्यात आली नाही मात्र एसीबीकडे लाच मागणीचा अहवाल आल्यानंतर वरीष्ठांच्या आदेशान्वये मंगळवारी सकाळी आठ वाजता दोघा संशयीतांना राहत्या घरातून अटक करण्यात आली. या प्रकरणी सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत श्रीराम पाटील यांच्या नेतृत्वात निरीक्षक संजोग बच्छाव, एएसआय दिनेशसिंग पाटील, नाईक बाळु मराठे, नाईक ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल राकेश दुसाने आदींच्या पथकाने केली.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह